aashadi-ekadashi
❁ || आषाढी एकादशी : वारकरी संप्रदायाची अखंड श्रद्धा”शुभेच्छा संदेश मराठीमध्ये | विठू माऊलीची भक्तिमय शुभेच्छा” || ❁
आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील एक अतिशय पवित्र आणि भक्तीमय सण आहे. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरातील पवित्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी उत्साहाने जमलेले असतात. प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या शुद्ध एकादशीला हा विशेष दिवस साजरा केला जातो, म्हणूनच त्याला ‘आषाढी एकादशी‘ म्हणतात.
या पवित्र दिवशी वारकरी संप्रदायातील भक्त महाराष्ट्रातील विविध भागांतून पालखी सोहळा घेऊन पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी प्रवास करतात. हा प्रवास त्यांच्यासाठी केवळ प्रवास नसून एक भक्तिभावनेने ओथंबलेला अनुभव आहे, ज्यामध्ये भजन, गीते आणि कीर्तनांनी वातावरण पवित्र होते. हा सोहळा भक्ती, आस्था आणि एकात्मतेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.
आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असे की, यावेळी भक्तांना देव विठ्ठलाची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. उपवास, प्रार्थना आणि अभंगांनी सजलेल्या या दिवशी, वारकरी विठ्ठलाशी एकरूप होण्यासाठी आपल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून हा उपवास करतात.
या दिवसाच्या निमित्ताने अनेक भाविकांची श्रद्धा विठूरायाच्या चरणाशी एकवटलेली असते, आणि हेच त्यांना पुढे जगण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा देते.
❁ नामातच तुझ्या विश्वास, होतो सर्वांचे आश्चर्यास
तुझे नाम सुखदायी विठ्ठला, आनंदात जगी व्हायी हीच एक आस रे !! ❁
❁ बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय !! ❁
❁ तूच मातापिता तूच बंधुदाता, ओठी विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
विसरून जातो सर्व चिंता सोडून अहंकार साऱ्या संसाराचा देवा विठ्ठला !! ❁
❁ || “विठ्ठलाचे अनमोल स्टेटस,विठुरायाचे भक्तिमय संदेश” ||❁
❁ आस लागे तुझी मुख दर्शन व्हावे आता,तुच आहे या विश्वाचा राजा
माऊली घे कुशीत या लेकराला,चरणी ठेविते हे विटू मी माथा !! ❁
❁ युगें अठ्ठावीस विटेवरी उभा माझा पाडुरंग हरी
जय देव जय देव पाडुरंगा !! ❁
❁ विठ्ठलाची ओढ तू , प्रेमाची साखर तू ,नाम तुझे देवा क्षणोंक्षणी
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल !! ❁
❁ पाडुरंगा नाम तुझे भक्तांच्या मुखावरी, तूच आनंदाचा सागर
तुझ्या भक्तीत आम्हा मिळे जीवनाचा आधार श्री हरी पाडुरंग !! ❁
❁ देवा तुझ्या चरणी आहे साऱ्या जगाचे, अनंत सुख
तुझ्या भक्तीने होते, आमच्या जीवनातील दुःख दूर
जय हरी विठ्ठल.. जय हरी विठ्ठल…..❁
❁ टाळ चिपळ्या हाती घ्या रे, करू गजर नाचू यारे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल गाऊ या रे !! ❁
❁ || विठू माऊली – विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीचा महिमा || ❁
❁ माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे !! ❁
❁ चल ग सखे चल ग सखे पंढरीला
तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला !! ❁
❁ पाडुरंगा दर्शन घेतो तुझे जोडूनी हात, संकटी दे आम्हाला साथ
जय हरी विठ्ठल.. जय हरी विठ्ठल…❁
विठ्ठल-रुक्मिणी हे महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी आदर्श, प्रेरणा आणि श्रद्धेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. विठोबाच्या रूपात श्रीविठल, जो श्री कृष्णाचे अवतार मानला जातो, तो भक्तांच्या हृदयात नवा उत्साह आणि प्रेम जागवतो. रुक्मिणी ह्या भगवान श्रीविठलाच्या अर्धांगिनी, भक्तीच्या प्रतीक आणि श्रीकृष्णाच्या साक्षात रूपाने मानल्या जातात.
विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन केल्यावर भक्तांच्या जीवनात अद्भुत शांती आणि दिव्य ऊर्जा येते. पंढरपूरच्या पवित्र भूमीत असलेले विठोबाचे मंदिर हे भक्तीचा मुख्य केंद्र आहे, जिथे लाखो वारकरी दरवर्षी आपल्या श्रद्धेचा ठरलेला मार्ग चालतात. विठोबाच्या चरणी भक्त आपली चिंता आणि दुःख विसरून त्याच्या पवित्रतेत रमून जातात.
❁ उभ्या जन्मात विठ्ठला वारी तुझी कधी चुकायची नाही,
देवा वाट पाहतो मी यंदा आस लागली तुझ्या भेटीची !! ❁
❁ आनंद मनाला तुझ्या दर्शनाची आस ठायी ठायी
गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा !! ❁
❁ राहुनि उपाशी करितो मी तुझी वारी , विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठला हरी
विठ्ठला हरी नामात देह रंगला, तुझ्या नावाचा महिमा भेटला
पांडुरंग.. पांडुरंग… ❁
❁ चंद्र्भागा नदी-तीरावर, मंदीर विठ्ठलाचे सुंदर
देव आहे उभा वीटेवर, ठेऊनी दोन्ही कर कटेवर
पाहू त्यांचे रूप, लावू ऊद आणि धूप
करु वंदन प्रभूच्या मूर्तीला हे श्री हरी पाडुरंगा !! ❁