गणपतीची आरती
aarti-karun-ganapatila-de
||आरती करूं गणपतीला दे ||
आरती करूं गणपतीला दे सुमतीला
चरण कमला नमन हे करुनि भक्तिला ॥ धृ. ॥
मूषक वाहना सिंदूर वदना कलिमल दहना जन

सुख सदना गाती जन तव गुण लीला देसिल्या त्वरीत दासाला ॥ १ ॥
त्रस्त मी होय संसारी प्रीती भारी कनकदारीं गांजिती मला हे भारी ॥
अघोर पापी ऎसा झालो, सद्बोधांमृत नच मी प्यालो दावून स्वरूप तूं करी मला पदरी दे ठाव दासाला ॥ २ ॥