गणपतीची आरती

 आरती करु तुज मोरया।

मंगळगुणानिधी राजया॥ आरती॥धृ.॥

सिद्धीबुद्धीपती संकटनाशा

विघ्ननिवारण तूं जगदीशा

आरती करु तुज मोरया॥१॥

aarti-karu-tuj-morya

धुंडीविनायक तू गजतुंडा।

सिंदूरचर्चित विलसित शुंडा॥

आरती करु तुज मोरया॥२॥

गोसावीनंदन तन्मय झाला।

देवा देखोनिया तुझ शरण आला॥

आरती करुं तुज मोरया॥३॥