दत्ताची आरती

आरती दत्तात्रयप्रभूची
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥

श्रीपदकमला लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥


कटिस्थित कौपिन ती वरती ।
छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥

aarti-dattatrayaprabhuchi

वर्णूं काय तिची लीला ।
हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले


ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥
अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥

गुरुवर सुंदर जगजेठी ।
ज्याचें ब्रह्मांडे पोटीं ।


माळा सुविलंबित कंठी ।
बिंबफळ रम्य वर्णूं ओष्ठी ॥ चाल ॥


अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलू, शंखचक्र करिं, गदापद्म धरि


जटामुकुट परि, शोभतसे ज्याची ॥
मनोहर शोभतसे. ॥ २ ॥

रुचिरा सौम्य युग्मह्रष्टी ।
जिनें द्विज तारियला कुष्टी ॥


दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।
केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल. ॥


दयाळा किती म्हणूनि वर्णू ।
वंध्या वृंदा, तिची सुश्रद्धा, पाडुनि बिबुधची


पुत्ररत्न जिस देउनिया सतिची ॥
इच्छा पुरविली मनिंची ॥ ३ ॥

देवा अघटित तव लीला ॥
रजकही चक्रवर्ती केला ॥


दावुन विश्वरुप मुनिला ।
द्विजादरशूल पळें हरिंला ॥ चाल ॥


दुभविला वांझ महिषी एक ।
निमिषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला


पतिताकरवी, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ॥
स्मराही महिमा. ॥ ४ ॥

ओळखुनि क्षुद्रभाव चित्ती ।
दिधलें पीक अमित शेती ॥


भूसर एक शुष्क वृत्ती ॥
क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल॥


ज्याची अतुल असे करणी ।
नयन झांकुनी, सर्वे उघडितां नेला काशिस


भक्त पाहातां वार्ता अशि ज्याची ॥
स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ ५ ॥

दयाकुल औदुंबरि मुर्ती ।
नमितां होय शांतवृत्ती ॥


न देती जननमरण पुढती ।
सत्य हे न धर मनि भ्रांति ॥ चाल ॥


सनातन सर्वसाक्षी ऎसा ।
दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि स्त्वर


आम्ही सविस्तर, पूजा करुं त्याची ॥
चला हो पूजा करुं त्याची ॥ ६ ॥

तल्लिन होउनि गुरुचरणीं ।
जोडुनि भक्तराजपाणी ॥


मागे हेंचि जनकजननी ।
अंती ठाव देऊ चरणीं ॥ चाल ॥


नको मज दुजे आणिक कांही ।
भक्तवत्सला, दीनदयाळा

परम कृपाळा, दास नित्य याची ॥
उपेक्षा करूं नको साची ॥ ७ ॥